तेलगाव । वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील नित्रुड शिवारामध्ये अंदाजे बारा तासा पूर्वी हरणाचा मृत्यू झाला आहे.
वडवणी येथील वन विभागाचे एकही कर्मचारी या ठिकाणी आला नसून या प्रकरणात संबंधित वनक्षेत्र अधिकारी धारूर मुंडे यांना या प्रकरणाची माहिती देण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांनी एकदा फोन रिसीव केला नाही म्हणून बीड येथील विभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकरणाची सर्व हकीकत सांगितले असता त्यांनी संबंधित अधिकारी यांना घटनास्थळी पाठवतो व पुढील कारवाई करण्यास सांगतो असे फोनद्वारे उत्तर दिले.
संबंधित हरणाचा मृत्यू हा पाण्याच्या भटकंतीमुळे शोधामुळे झाला असावा आसे परिसरातील शेतकरी चर्चा करत आहेत परंतु संबंधित हरणाचा मृत्यू बारा तास होऊन गेले असतानाही या ठिकाणी वनखात्यातील एकही कर्मचारी फिराकला नसून त्यामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Leave a comment