गेवराई । वार्ताहर
येथील सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन, आ. लक्ष्मण पवार यांनी रविवारी ता. 26 रोजी प्रत्यक्ष भेटी घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले. अडचणीच्या वेळी धावून जाणे, हा महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा सांस्कृतिक वारसा असून सामाजिक जाणीव ठेवणे आपली जबाबदारी आहे. शहरातील कोणीही माणूस उपाशी पोटी राहणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ असे आवाहनही आमदार लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना केले आहे. आमदार पवार यांनी प्रत्यक्ष भेटून कौतुक केल्याने पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीने अडचणीत आलेल्या शहरातील गोरगरिब कुटुंबाची काळजी घेणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आमदार लक्ष्मण पवार यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष भेटी घेऊन कौतुक केले. कोरोना सारख्या महामारीने सगळी कडे लॉकडाऊन असल्याने, गोरगरिब कुटुंबाच्या अडचणी वाढल्या असून, यागोरगरिबांची काळजी घेण्यासाठी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. वीस दिवसापासून शहरातील गरजुंना किराणा कीट, खिचडी, जेवन, अन्नधान्य पुरविण्यात येत आहे.लॉकडाऊन असल्याने कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या गोरगरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले असून युवा कार्यकर्त्यांचा ग्रूप गेल्या वीस दिवसापासून शहरातील व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाला आधार देऊन, जबाबदारी पार पाडत आहेत. अशा कठीण काळात गोरगरिबांची काळजी घेऊन सामाजिक ऋणानुबंध जोपासून काम करणार्या विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांचे कामाचे आ. पवार यांनी कौतुक केले. या उपक्रमात सहभाग असलेल्या सामाजिक संस्थेचे संतोषी मा बॅन्केचे संजय भालशंकर, डॉ. धनंजय माने, शैलेश जाजू, डॉ अशोक काळे, माधव बेदरे, गणेश मोटे, अशोक पंडीत, शिवस्वराज्य ग्रुप, पांडुरंग यात्रा कंपनी, दत्तराज पार्कचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप मुळे यांच्या त्यांनी भेटी घेतल्या.
Leave a comment