बीड । वार्ताहर
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सौर उर्जा प्रकल्पाच्या बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष धर्माधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 22 एप्रिलच्या पुर्वी अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील सौर उर्जा प्रकल्पाच्या बॅटर्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि गोडसे हे करत आहेत.
Leave a comment