परळी । वार्ताहर
आम्ही पोलिस आहोत असे सांगत तोंडाला मास्क का लावला नाही असे म्हणत दोघांनी तरूणास मारहाण केल्याची घटना सिरसाळा भागात घडली.
परळी तालुक्यातील सिरसाळा येथील रानमळा हिवरा शिवार परिसरात हनुमान सुदाम उदले हे आई-वडीलांसह झाडाखाली बसले असता त्याठिकाणी आलेल्या रंजित अशोक देशमुख (रा.कान्हापूर,ता.धारूर), वैजनाथ रूस्तूम निर्मळ (रा.हिवरा,ता.परळी) या दोघांनी आम्ही पोलिस असल्याचे सांगून लाथा-बुक्क्याने व काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी तोतया पोलिस असलेल्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment