बीड । वार्ताहर
एका व्यापार्याला कुकरीचा धाक दाखवून सहा जणांनी लुटल्याची घटना शनिवारी पेठ बीड भागात घडली. रोख रक्कम आणि मोबाईल असा 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. या प्रकरणी पेठ बीड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमोल अर्जून कोळी (रा. पारगाव ता.वाशी जि. उस्मानाबाद) असे लुट झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी तो खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातून रिक्षातून (एम एच 16, एवाय 4516) सामान घेऊन जात असताना सहा जणांनी कुकरीचा धाक दाखवून त्याच्याकडून 53 हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल लुटला. या प्रकरणी अमोल कोळी यांनी पेठ बीड पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बनकर हे तपास करत आहेत.
Leave a comment