आष्टी (प्रतिनिधी)

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनने अनेक गोरगरीबांची उपासमार सुरु आहे .अनेक परिवार उघड्यावर आले आहेत.आष्टी , पाटोदा,शिरुर या  तालुक्यातील गरीबांना   जीवनावश्यक वस्तुंची मदत करणे ही काळाची गरज आहे.आठ्ठेगाव पुठ्ठ्यातील मुगगांव ही गरजुंना जीवनावश्यक वस्तुंची मदत करणारी पहिली ग्रा.पं.आहे.सरपंच परिषदेचे पाटोदा तालुका सरचिटणिस तथा सरपंच  संजय खोटे अभिनंदनास पात्र आहेत मात्र कोरोना संचारबंदीत पोलिस,आरोग्य कर्मचारी, आशाताई,अंगणवाडीताई ,शिक्षक ,डॉक्टर्स,१०८ गाडीचे चालक पारिचारीका हे जीवाची पर्वा न करता अहोरात्र नागरीकांसाठी सेवेत आहेत त्यांच्या कार्याला आपण सलाम करतो. महाराष्ट्रातील सर्व सरपंच ,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य यांचे अभिनंंदन करीत सरपंच परिषद आणि

 मुगगाव ग्रा.पं.ने १११ गरजुंना किराणा व धान्य वाटप केले असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले.

    सरपंच परिषद व सरपंच संजय खोटे यांनी मुगगाव येथील १११ गरजुंना बाजरी ,ज्वारी  धान्य ,तांदुळ व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

    सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता काकडे यांनी मदत देण्याचे सांगितल्यानंतर मुगगाव येथिल एकशे अकरा कुटुबांना ज्वारी ,तांदुळ ,व एक महिन्याचे किराणा सामान दि.२६ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत   वाटण्यात आले.

याप्रसंगी माऊली जरांगे म्हणाले की,कोरोना रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये असे वाटत असेल सर्वानी घरातच बसावे शासनाच्या नियमाचे पालन करावे ,संचालबंदीत कुठेही फिरु नये.या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांची ,अपंग ,गरीब जनतेची उपासमार सुरु आहे.गावगावातील दानशुर व्यक्तीनी स्वतः पुढे येऊन आपल्याच माणसांस मदत करणे ही काळाची गरज आहे असे सांगीतले.

यावेळी माऊली जरांगे,सभापती सौ.सुवर्णा  लांबरुड ,सरपंच संजय खोटे,भाऊसाहेब भवर ,ग्रामविकास अधिकारी दत्ता नागरे यांच्या हस्ते १११ परिवारास जीवनावश्यक वस्तुचे वाटप सोशल डिस्टींगचे काटेकोर पालन करुन वाटप करण्यात आले.मुगगाव ग्रामपंचायच्या स्वच्छ प्रांगणात रिंगन करुन गरजवंतास ही वाटप करण्यात आली.यावेळी  शिवाजी भवर ,बापु खोटे,उपसरपंच संतोष भवर,सुर्यभान भवर,दादा हंबर्डे,राजेंद्र भवर,उमेश खोटे,राजेंद्र भवर,खंडु खोटे,विशाल खोटे,गहिणीनाथ गोरे,मारुती पवार,नितीन  सुळे,परमेश्वर खोटे,जानदेव खोटे,अशोक खोटे,किरण शिरोळे,सतिष गिरी हे उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.