बीड | वार्ताहर

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात शुक्रवारी दाखल झालेल्या
एकूण सहा जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी एकाचा रिपोर्ट शनिवारी (दि.25) सायंकाळी प्राप्त झाला, तो निगेटिव्ह आला आहे. उर्वरित, 5 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा होती, दरम्यान रात्री उशिरा ते पाच रिपोर्टही जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले, ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी सहा जण विलगीकरण कक्षांमध्ये दाखल झाले. ते सर्व जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पैकी गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल शनिवारी सायंकाळी बीडच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला होता तो निगेटिव्ह आल्याने अन्य पाच अहवालांची प्रतीक्षा होती, ती ही रात्री उशिरा संपली, कारण सारे पाचही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात तपासलेले सर्व 186 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.