बीड : तालुक्यातील मांडवजळी या गावात भिल्ल वस्ती आहे डोंगराळ भागात 23 कुटुंब भिल्ल समाजाचे आहे. हे सर्व ऊसतोड मजूर असून. कोणालाही स्वतःचे घर नाही. गावातील विहिरवर पाणी भरू देत नाही. पाणी आणायला दूर जावे लागते. अशातच काही लोकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ.सचिन मडावी याना माहीती सांगितली. त्यांनी लगेच सकाळी स्वतःच्या पैशातून पाण्याचे 7000 लिटरचे पाणी टँकर घेऊन स्वतः वस्तीवर गेले सर्व 23 कुटुंबाना पाण्याची व्यवस्था केली.
धान्यची व्यवस्था केली.संचार बंदीमध्ये रोजगार तर गेलाच मात्र पाणी सुद्धा भेटत नाही. त्यामुळे वस्तीवरील महिला अक्षरशः रडत होत्या. सर्वाना महिनाभर पुरेल एवढे धान्यचे नियोजन लावले. वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय समाज कल्याणच्या आश्रम शाळेत करून दिली. तसेच या वस्तीवरील कोणाकडेही राशन कार्ड नाही. त्यासाठी स्वतः डॉ.मडावी पुरवठा अधिकारी श्री.आघाव पाटील साहेबाना बोलले. लवकरच त्यांना राशन कार्ड मिळेल. तसेच कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटावा यासाठी गट विकास अधिकारी तुरूंकमारे यांच्याशी चर्चा केली. असुन विशेष बाब म्हणुन लवकरच या वस्तीवर पाणी पुरवठा योजना सुरू केली जाईल असे गट विकास अधिकारी रवींद्र तूरूकमारे यांनी सांगितले.
Leave a comment