धारूर : कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरात गरजूंना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने किल्ले धारूर पत्रकार व किल्ले धारूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहरातून जास्तीत जास्त युवकांनी, नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी नाव नोंद करावी हे रक्तदान शिबीर 27 एप्रिल रोजी वेळ सकाळी 10 ते 2 यावेळेत ग्रामीण रुग्णालय किल्लेधारूर येथे होईल. सर्व शासकीय नियमांचे पालन करुन व सोशल डिस्टन्स पालन करून हे शिबीर होेईल. यासाठी 9422659710,9975441494 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment