आष्टी । वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आष्टी तालूक्यातील चिंचाळा येथील 28 व 29 एप्रिल रोजी होणारी जगदंबा देविची याञा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या यात्रेस पुणे आणि मुंबई येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
ग्रामस्थांनी जगदंबा देवी यात्रा महोत्सवाचे एप्रिल 28 व 29 या दोन दिवशी असते अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत 28 एप्रिल रोजी पालखी व सांस्कृतिक कार्यक्रम आणि 29 एप्रिल रोजी जंगी कुस्त्यांचे सामने असतात. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच यात्रेत पुणे आणि मुंबई येथील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसाठी येणारे पाहुणे, भाविक आणि मल्ल यांनी याची नोंद घ्यावी नसता येणार्या पाहुणे व चिंचाळा गावातील कुटुंब प्रमुख यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल असे आवाहन ग्रामसेवक रामेश्वर भवर, सरपंच दिगांबर पोकळे (नाना), ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देवस्थान व यात्रा कमिटी तसेच ग्रामस्थांनी बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Leave a comment