बीड । वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील कोथाळा येथे बांधावरुन दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी चौघांवर सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
अशोक पंडितराव सोळंके (रा.कोथाळा) यांच्या फिर्यादीनुसार, बांधावरील झुडूपे तोडल्याबद्दल का विचारतो, या कारणावरुन त्यांच्यावर कुर्हाडीने हल्ला केला. यात ते जखमी झाले. ज्ञानेश्वर राजाभाऊ कदम, तुकाराम राजाभाऊ कदम यांच्यावर रिसाळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. ज्ञानेश्वर कदम यांनीही फिर्याद दिली. झुडूपे तोडण्यावरुन त्यांना दगड व कुर्हाडीने मारहाण केल्यावरुन अशोक पंडितराव सोळंके व रवींद्र वैजीनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment