अंबाजोगाई । वार्ताहर
जमिनीच्या कारणारुन चिंचखंडी (ता.अंबाजोगाई) येथे सख्खे भाऊ आमने -सामने आले. यावेळी दोन गटांत हाणमारी झाली. शुक्रवारी ही घटना घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन सात जणांवर गुन्हा नोंद झाला.
नागोराव बळीराम गडदे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी भावास ‘तुझ्या वाट्याला आलेली जमीन वडिलांना दे, अन्यथा ती वहिती करु नको’ असे सांगितले. त्यावर खोर्याच्या दांड्याने त्यांना व पत्नी यमुना यांना मारहाण केली. विश्वंभर बळीराम गडदे, मीरा विश्वंभर गडदे, सिमींताबाई बळीराम गडदे, त्रुशाला भीमराव सोन्नर (सर्व रा. चिंचखंडी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तर सिमींताबाई बळीराम गडदे (60) यांच्या फिर्यादीनुसार ‘तू विश्वंभरकडे भांडी घासायला का जाते?’अशी कुरापत काढून त्यांना आरोपींनी मारहाण केली. यावेळी मुलगा विश्वंभर सोडविण्यासाठी आला तेंव्हा त्यालाही मारहाण करुन धमकावले. सीमींताबाई गडदे यांच्या फिर्यादीवरुन नागोराव बळीराम गडदे, यमुना नागोराव गडदे, हरिदास संपत्ती चामनर (सर्व रा. येल्डा) यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment