विडा येथील घटना; कारण अस्पष्ट
केज । वार्ताहर
एका विवाहित जोडप्याने प्रेमसंबंधातून लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची तालुक्यातील विडा येथे शनिवारी (दि.25) ही घटना समोर आली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करुन मृतदेह खाली उतरवत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, पोलीस अधिक तपास करत आहेत.
बापू सिताराम दुनघव (38) व छाया विठ्ठल गायकवाड (36, दोघे रा.विडा, ता.केज) अशी मयत जोडप्याची नावे आहेत. हे दोघेही विवाहित होते. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. मयत बापुच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी तर मयत छायाच्या पश्चात पती व दोन मुली एक मुलगा आहे. बापू दुनघव हा मोलमजुरी करून कुटुंबाची गुजरान होता. तर त्यांच्या घराच्या शेजारी छाया विठ्ठल गायकवाड ही घरकाम करत होती. या दोघांचे घर हे एकाच परिसरात आहेत. विडा शिवारातील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. दोघांच्या चपला व दोघांचे मोबाईल झाडाखालीच आढळून आले. दरम्यान यातील एका मोबाईलमधील बॅटरी काढून बाजूला पडली असल्याचे दिसून आले तर लिंबाच्या झाडावर बापू दुनघव व छाया गायकवाड हे एकत्रितपणे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नायलॉनची मोठी दोरी एकाच फांट्याला बांधली व दोरीच्या एका टोकाला बापूने तर दुसर्या टोकाला छायाने आपल्या गळ्याला बांधून एकत्रितपणे आत्महत्या केली असल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच विडा बिटचे पिएस आय मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, हनुमंत चेवले व पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून म्रतदेह शवविच्छेदनासाठी विडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारच्या सुमारास दोन्ही मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या विवाहित प्रेमीयुगलांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोघांचेही कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. केज ठाण्यात आकस्मिक म्रुत्युची नोंद करण्यात आली आहे.
--------------
Leave a comment