बीड । वार्ताहर
शहरातील कनकालेश्वर मंदिर परिसरातील पाच दुकानांना आज शनिवारी (दि.25) दुपारी अचानक आग लागली. लॉकडाऊन असल्यामुळे मागील महिनाभरापासून ही भंगार साहित्याची दुकाने बंद आहेत. शॉटसर्किटने ही आग लागलीअसावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या दोन बंबाना पाचारण करण्यात आले. त्यानंतर जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली.यावेळी धूराचे लोळ पसरल्याने परिसरातील लोकांना दुकानांनी पेट घेतल्याचे लक्षात आले. शॉटसर्किटने ही दुकाने पेटली असावीत असा अंदाज पेठ बीड पोलीसांनी व्यक्त केला आहे.
Leave a comment