मुंबई: । वार्ताहर
राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना सरकाकरने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि औषधोपचार मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी यांनी आज दिली.
कोरोनाची चाचणी करण्यासाठी खाजगी लॅब ४ हजार ४०० रुपये आकारत होती, तर शासकिय रुग्णालयात काही प्रमाणात शुल्क आकारलं जात होतं. कोरोनाच्या चाचण्या करणे गरीबांना परवडणारं नाही. तसंच औषधोपचाराचा खर्च देखील न परवडणारा आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे मोफत करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी लोकांनी पुढे यावं तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिक चाचणीसाठी आणि उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी पुढे येत नाही आहेत. मात्र, या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणं शक्य होणार आहे. या निर्णयाने कोविड-१९ ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच जास्तीत जास्त चाचण्या होतील, असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला.
राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण; दिवसभरात १८ जण दगावले
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून आज दिवसभरात करोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ३१० वर पोहचला आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाबत म्हणजे रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत ९५७ पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रात कालच्या तुलनेत करोनाबाधित नवीन रुग्णसंख्येचा आकडा जवळपास निम्याने घटला असला तरी, राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या बळीने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. आज शुक्रवारी ३९४ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासात राज्यात १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात ११ जण मुंबईतील तर पाच जण पुण्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामुळे राज्यातील मृत्यू संख्या ३०१ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Leave a comment