बारा शेतकर्यांवर गुन्हा
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील देवीनिमगाव येथे कडा मध्यम प्रकल्पाच्या धरणाला छिद्र पाडून पाणी पळविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.23) समोर आला. यावरुन 12 शेतकर्यांवर अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
तालुक्यातील देवीनिमगाव येथे कडा मध्यम प्रकल्प आहे. या धरणाच्या भिंतीवर पाईप टाकून तसेच भिंतीला छिद्र पाडून 12 शेतकर्यांनी पाणी पळविले. हा सर्व प्रकार पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आला. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक रामानंद आकसाळ यांनी याबाबत अंभोरा ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन चंद्रकांत गर्जे, दिनकर आंधळे, नवनाथ गर्जे (सर्व रा. निंबोडी), हरिदास रांगोळे, साहेबराव वायकळे, मेहरु पाचे, भगवान पाचे, बाजीराव रांगोळे व इतर चार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment