वडवणी । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात दारु दुकानात चोरीचे प्रकार वाढले आहेत. वडवणी येथे आणखी एका दुकानात चोरट्यांनी हात साफ करत 20 हजार 700 रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या लंपास केल्या.

दीपक संपतराव उजगरे यांचे वडवणी-परळी राज्य मार्गावर बिअरबार आहे. चोरट्यांनी 22 रोजी रात्री पाठीमागून दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. काऊंटरजवळील कपाटात ठेवलेल्या 20 हजार 700 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या 86 बाटल्या लंपास केल्या. या प्रकरणी दीपक उजगरे यांच्या फिर्यादीवरुन वडवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी येथे एका दारु दुकानात चोरी झाली होती. आता पुन्हा एकदा बिअरबार फोडून बाटल्या चोरुन नेल्याने खळबळ उडाली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.