बीड । वार्ताहर
एपीएल शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी मे महिन्यातील धान्य वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अॅप्सचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करणे गरजेचे असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्स निकष पाळून शुक्रवारी (दि.24) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते असे तहसीलदार किरण आंबेकर यांनी सांगितले.
बैठकीसाठी तालुक्यातून उपस्थित राहणार असल्यामुळे तहसील कार्यालय येथे बैठक न घेता बीड येथे स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोशल डिस्टन्स निकष पाळून बैठक घेण्यात आली. नाट्यगृहाची क्षमता एक हजार खुर्च्यांची असल्यामुळे व उपस्थितांची संख्या त्यापेक्षा कमी असल्याने निकष पाळले गेले.बीड येथे नाट्यगृहात तालुका प्रशासनाने आयोजित केलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीला बीड तालुक्यातील धान्य दुकानदार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी समन्वयन अधिकारी म्हणून नियुक्त केलेले शिक्षक व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment