गेवराई । वार्ताहर
कोरोनासारख्या रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या दरम्यान दारुविक्री करण्यास बंदी आहे. मात्र गेवराई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध मार्गाने दुप्पट, तिप्पट भाव वाढवुन दारूविक्री केली जात असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करत आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाला या साथ रोगाला रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. सार्वजानिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे. स्थानिक पातळीवर महसुल, पोलिस, डॉक्टर कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. परंतू लॉकडाऊनच्या काळात दारूचीदुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असतांना देखील शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध मार्गाने भाव वाढ करुन दारूविक्री करण्यात येत आहे. मात्र याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केले की काय हा प्रश्न निर्माण झाल असुन अवैध मार्गाने दारु विक्री करुन लॉक डाऊन दरम्यान बनावट दारु विकुन नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यावर कार्यवाही होणार का? निर्माण झाले आहे. स्थानिक गुन्हे अनवेश विभाग व गेवराई पोलिसांनी वेळोवेळी कार्यवाही केली मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करतो? असे अनेक प्रश्न नागरिक विचारु लागले आहे.
Leave a comment