आष्टी । वार्ताहर
कोरोना विषयी जनजागृती करून शुक्रवारी तालुक्यातील सांगवी (आष्टी), खडकत, पारगाव, टाकळसिंग सह आदी गावात पंचायत समिती सभापती बद्रीनाथ व गटविकास अधिकारी सुनील भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व कुटुंबाना स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
आष्टी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून विशेषतः ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव रोखण्यावर प्राध्यान्याने भर दिला जात आहे.याचीच एक बाब म्हणून आष्टी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील सांगवी (आष्टी) खडकत पारगाव टाकळसिंग सह आदी गावात सनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.तसेच गावक-यांना बाहेर न निघण्याचे आवाहन करीत जनजागृती देखील केली आहे.यावेळी सरपंच कांतीलाल जोगदंड उपसरपंच लालासाहेब जगताप ग्रामसेवक राऊत ग्राम पंचायत सदस्य राजाभाऊ जगताप,दत्ता दौडे,गणेश मदने, बाळासाहेब देवकाते,अंगणवाडी सेविका जयाताई सपकाळ,प्रशालेचे मुख्याध्यापक महेश शिंदे,बाळासाहेब जगताप,दिलीप जगताप,बाळासाहेब सुपेकर,उद्धव नेटके उपस्थीत होते.
Leave a comment