150 जणांना डिस्चार्ज, बाधित रुग्णांची संख्या 5649 वर

मुंबई । वार्ताहर

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 हजार 649 वर गेला असल्याची माहिती मिळत आहे. चिंतेत टाकणारी बाब म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 431 नवीन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर याच कालावधीत जवळपास 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या 18 जणांच्या बळीमध्ये एकट्या मुंबईतील 10 जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुळं राज्यात मृत्यूमुखी पडणार्‍या रुग्णांची संख्या आता 269 वर पोहचली आहे.

मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे आजच्या दिवशी जवळपास 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यानुसार आता कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 789 झाली आहे. यामध्ये 441 पुरुष तर 281 महिलांचा समावेश आहे. 23 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाल्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात 789 रुग्णांची या आजारातून मुक्तता करण्यास राज्य सरकारला यश आले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे 26 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्ण, 21 ते 30 मधील 160 रुग्ण, तर 51 ते 60 या वयोगटातील 98 रुग्णांचा समावेश. लक्षणीय बाब अशी की 91 ते 100 या वयोगटातील एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.