जालना । वार्ताहर
जालना-मंठा रोडवरील रामनगर भागातील हॉटेल पृथ्वीराज, राजवीर परमिट रुम आणि निसर्ग परमिट रुममधून अवैध विदेशी दारु जादा दराने विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हा शाखेची पो.नि. राजेंद्रसिंह गौर यांनी आपल्या पथकासह छापा मारला असता तिन्ही हॉटेलमधून 81 हजार 850 रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. जादा दराने दारु विक्री करणार्या आकाश गाढवे, ज्ञानेश्वर यज्ञेकर व श्रीराम यज्ञेश्वर जोशी यांच्या सांगण्यावरुन जादा दराने ही दारु विकली जात असल्याची माहिती दिली गेली. राजविर परमिट रुममधून 6 हजार 500 रुपयांची विदेशी दारु, तसेच शेतामध्ये लपवून ठेवलेली 62 हजार 750 रुपयांची दारु पोलीसांनी जप्त केली. रामनगर येथील हॉटेल निसर्ग येथेही पोलीसांनी छापा मारला असता 4 हजार 800 रुपयाची दारु जप्त करण्यात आली.
परमिट रुमचे मालक शाम प्रल्हाद राठोड यांच्या विरोधात दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही हॉटेलमध्ये मिळून 81 हजार 850 रुपयांची दारु जप्त करण्यात आली असून हॉटेल मालक आणि विक्री करणारे नोकर अशा 5 जणांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, शेख रज्जाक, पो.कॉ.सुरेश गित्ते, शॅम्युल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, हिरामण फलटणकर, मदनसिंह बहुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विलास चेके, महिला पो.कॉ.आशा जायभाये, चालक रमेश पैठणे यांनी ही कारवाई केली.
Leave a comment