दिल्ली । वृत्तसेवा

देशभरामध्ये ज्या भागात आणि जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गरूग्ण कमी झाले आहेत. आणि गेल्या दोन आठवड्याच्या कालावधीत ज्या जिल्ह्यात रूग्ण सापडलेला नाही त्या जिल्ह्यामध्ये सर्व व्यवहार पुर्ववत करून देशातील मुंबई, पुणे, नागपुर, इंदौर, जयपुर, नोव्हेडा, दिल्ली, कोलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये पुन्हा नव्याने नियोजन करण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या स्तरावर सुरू असून देशभरामध्ये अशा शहरात पुन्हा लॉकडाऊन वाढण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने लॉकडाउननंतरच्या सवलतींबाबतचा आराखडा तयार करण्यास सुरवात केली आहे. तब्बल 33 दिवसांचा लॉकडाउन 3 मेनंतर पुढेही सरसकट वाढवला तर जेथे कोरोनाचा उद्रेक नाही तेथेही लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. कोरोनाचा सामूहिक प्रसार रोखणे, अर्थकारणाचे चाक फिरते राहील याची काळजी घेणे आणि लोकांचा संताप वाढू न देणे यांचा समतोल साधण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे.  जेथे कोरोनाचा प्रसार नाही व 28 दिवसांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही, त्या ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना सूट दिली जाईल. मात्र गर्दी जमू नये यासाठीच्या अटी तेवढ्याच पाळण्यात येतील. ग्रीन झोनमधील लॉकडाउन उठविण्याबाबत मंत्रिगटामध्ये तत्त्वतः सहमती झाल्याचे समजते. त्याच वेळी लॉकडाउन उठविल्यानंतर मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगच्या अटींचे पालन होत नसल्यास पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा पर्यायही खुला ठेवण्यास संबंधित जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात येणार आहे. आंतरराज्य बससेवा, रेल्वे आणि विमान वाहतूक लगेच पूर्ववत होण्याची शक्यता कमीच आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.