नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या सोमवारी, अर्थात 27 एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते देशवासियांना उद्देशून भाषणही करणार आहेत. भारतातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुख्यमंत्र्यांशी आणि जनतेशी संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. ते मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या राज्यांमधील कोरोना स्थिती जाणून घेतील व केंद्र सरकारची भूमिका त्यांना ज्ञात करतील. त्यांना सूचनाही देतील. नंतर देशवासियांना ते काय सांगणार आहेत, त्यासंबंधी उत्सुकता आहे. कदाचित ते काही नव्या घोषणा करतील असेही अनुमान व्यक्त होत आहे.
Leave a comment