बीड । वार्ताहर
येथील संपादक गंमत भंडारी यांना गुरुवारी पाचवे न्यादंडाधिकारी राऊत यांच्या न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला . पोलिसांनी अधिक तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली आणि जामिनावर मुक्तता केली.
गंमत भंडारी यांनी त्यांच्या दैनिकाच्या वेब पोर्टल वरून खोटी बातमी टाकली होती या वरून पिंपळनेर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये त्याना काल पोलिसांनी अटक केली होती
या प्रकरणात संपादक गंमत भंडारी यांच्या वतीने ऍड बाळासाहेब कोल्हे आणि विलास जोशी यांनी काम पाहिले.
Leave a comment