मुंबई । वार्ताहर
आज राज्यात ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ५६४९ झाली आहे. १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे आरोग्य खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या १८ मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत. तर १२ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये (६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६९ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९०,२२३ नमुन्यांपैकी ८३,९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६७९८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,०९,०७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.(संग्रहित फोटो)
Leave a comment