बीड । वार्ताहर

महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोविड -19 विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. 

लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडले आहेत. बांधकाम कामगार आवर बेकारीचे संकट ओढवले असल्यामुळे या संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डी.बी. टी.पद्धतीने दोन हजार रुपये अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी जिल्हा कामगार कार्यालयाकडून नोंदणी व नूतनीकरण असलेल्या जीवित सक्रिय कामगारांची यादी येत आहे. कामगारांनी कुठलाही अर्ज भरण्याची किंवा चौकशीसाठी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा व्यक्तीची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला करावी. असे कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी एस पी राजपूत यांनी कळविले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.