गेवराई । वार्ताहर
सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. तुम्ही आमच्या घरी येत जावु नका असे सांगण्यास गेलेल्या एकास व त्याच्या कुटूंबातील सदस्यांना मारहाण करत धमकावण्यात आले. मंगळवारी (दि.21) सकाळी दहा वाजेच्या सुमारास विठ्ठलनगर रेवकी-देवकी (ता.गेवराई) येथे ही घटना घडली.
कांता नाना देवकते (40) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सध्या कोरोना साथरोग सुरू आहे. तुम्ही आमच्या घरी येत जावु नका असे सांगितले असता शिवाजी शिंदे, संभाजी फुलारे, शिवाजी फुलारे व शांताबाई फुलारे या चौघांनी संगनमत करत घरात घुसून देवकते कुटूंबाला काठ्याने मारून डोके फोडुन जखमी केले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी चौघांविरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment