बीड । वार्ताहर
भाजप नेत्या पंकजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बुधवारी सकाळी चौसाळा चेकपोस्ट येथे कारखाने वरून स्वघरी परतणारे जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांना भोजन पाकिट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. दरम्यान आई वडील मुलगा यांच्या आणि त्यासाठी आतुरलेला कामगार वर्ग आनंदी दिसत होता नातेवाईकांच्या भेटी साठी आतुरलेला डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून कामगारांची मोठी आवक आली विडा नेकनुर लिंबागणेश या परिसरातील मजूर बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य,भारत काळे, विक्रांत हजारी, ऊसतोड कामगार संघटनेचे कृष्णा तिडके, जेष्ठ नेते शातीनाथ डोरले,शरदराव झोडगे, भाऊसाहेब सावंत, राहुल जोगदंड, बाळासाहेब हावळे, उपसरपंच बाळासाहेब गात, विकास गव्हाणे, बद्रीनाथ जटाळ, राकेश बिराजदार , अजय ढाकणे,वामण मुंडे, सुहास जोगदंड, पंकज धांडे,अमोल जोगदंड, अमर जोगदंड, रामदास जोगदंड,व, पत्रकार सर्वश्री, विकास नाईकवाडे, बळीराम राऊत,प्रसाद देशमुख, विकास सर्वदणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment