बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधीला मदतीचा ओघ वाढत आहे. बीड जिल्ह्यातील एका सेवानिवृत्त शासकीय अधिकार्यानेही यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे.
सेवानिवृत्त उपअभियंता व राजपत्रित अधिकारी महासंघाचे जनसंवाद सचिव सतीश देशपांडे यांनी बुधवारी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान सहायता निधी साठी प्रत्येकी 11 हजार रूपयांचे दोन स्वतंत्र धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे व उपकोषागार अधिकारी सतीश घोळवे आदि उपस्थित होते. अशा पध्दतीने कोरोनाच्या लढ्यात शासन, जनता आणि शासकीय अधिकार्यांनी दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरत आहे.
Leave a comment