गेवराई । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील 10 जिनिग आहेत. त्यामध्ये अनेक परप्रांतिय लोक मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत पण लॉकडाऊनच्या काळात या कामगारांवर उपासमारीला सामोरे जावे लागत आहेत यांना धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.लक्ष्मण पवार यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
गेवराई तालुक्यातील महाबली कॉटन इंडस्ट्रीज,प्रसाद कॉटन इंडस्ट्रीज,सागर इंडस्ट्रीज,एक लिंगेश्वर जिनिग प्रेसिंग,बालाजी ऑईल इंडस्ट्रीज,माधव कॉटन इंडस्ट्रीज, गिरीराज इंडस्ट्रीज,मनजित कॉटन, समिश्या जिनिग,कालीका फायबस,सोमानी जिनिगमध्ये शेकडो कामगार काम करत आहेत अशा लॉकडाऊनच्या काळात सदरील मजुरांना शासकीय दरानुसार स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यासाठी आपण तहसीलदार व पुरवठा आधिकारी अशोक भंडारे यांना सुचना देण्यात देण्यात आली आसल्याचे आ.पवार यांनी सांगितले.
Leave a comment