नांदुरघाट । वार्ताहर
केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथील पंचायत समिती सदस्य सविता कोकाटे यांचे पती प्रेमचंद कोकाटे यांनी स्वखर्चाने तसेच स्वतःच्या हाताने शिवून तयार केलेले पाच हजार मास्क नागरिकांना वाटप केले आहेत.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वापरल्या जाणार्या सुरक्षितेसाठी मास्क महत्त्वाचे आहेत हे जाणून घेऊन प्रेमचंद कोकाटे यांनी स्वतःचा जुना छंद जोपासून दोन ते तीन जणांची टीम मार्फत गावोगावी मास्क वाटप करण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील आपणही समाजासाठी काही देणे लागतो, या उद्देशाने शेतकर्यांसाठी सर्वसामान्यांसाठी मास्क बनवून वाटले. लॉकडाऊन आहे तोपर्यंत मास्क कमी पडू देणार नाही असे प्रेमचंद कोकाटे यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
Leave a comment