वृत्तपत्र घेताना व वितरण करताना मास्क, रुमाल, हॅड सनिटायझरचा वापर करा-जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात घरोघरी वृत्तपत्राचे वितरण करण्याचे झाल्यास वृत्तपत्र घेणारी व्यक्ती व वृत्तपत्र वितरण करणारी व्यक्ती दोघांनीही फेस मास्कचा व स्वच्छ रुमाल आणि हँड सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवावे. वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र घेणा-या व्यक्तींची अनुमती घेणे बंधनकारक आहे. तसेच कन्टेन्मेट झोनमध्ये वृत्तपत्रांचे घरोघरी जाऊन वितरण करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.

आदेशातील निर्बंधाची  किंवा आदेशाची अवज्ञा करणा-या व्यक्ती ,संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता (1860 चा 45) च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व संबंधितांवर या कलमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.