डिव्हीआर मशिनसह रक्कम लंपास

आष्टी । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपुर्ण बीड जिल्ह्यात संचारबंदी लागु असतानाही चोरीच्या घटना मात्र सुरूच आहेत. आष्टी येथील बंधन बँकेच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडुन चोरट्यांनी डिव्हीआर मशिनसह काही रक्कम लंपास केली. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी आष्टी पोलीसात तक्रार नोंदवली.
आष्टी शहरात बंधन बँकेची शाखा आहे. दि. 13 ते 21 एप्रिल या कालावधीत चोरट्यांनी बँकेच्या चॅनल गेटचा कोंडा तोडुन आत प्रवेश केला. आतील तीन हजार 360 रूपयांच्या रक्कमेसह सीसीटीव्ही स्टोरेजची डिव्हीआर मशिन असा एकुण 23 हजार 360 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक शितल तनपुरे यांनी आष्टी ठाण्यात तक्रार नोंदवली. पो.ह. आगलावे पुढील तपास करीत आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.