मुंबई । वार्ताहर

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजारवर ळगेला असून एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात 552 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आता एकूण रुग्ण संख्या 5 हजार 218 झाली आहे. तर 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 722 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 4 हजार 245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 218 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 7 हजार 808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.राज्यात मंगळवारी 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. तर आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील 12, पुण्यातील 3, ठाणे मनपामधील 2 तर सांगली येथील 1 आणि पिंपरी चिंचवड येथील 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 10 पुरुष तर 9 महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत. तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 1 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये (63 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
-------

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.