माजलगाव । वार्ताहर
माजलगाव शहरातील गजानन मंदिर महिला भजनी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 35 हजार रुपयांचा धनादेश माजलगावच्या तहसीलदार डॉ. प्रतिभाताई गोरे यांच्याकडे दि.२१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता दिला आहे
कोरोना साथीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून या जीव घेण्यासाठी ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार खूप मोठे प्रयत्न करीत आहे. परंतु समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून माजलगाव शहरातील गजानन मंदिर महिला भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात सप्ताहाचे आयोजन केले जात होते.परंतु या वर्षी कोरोना साथी मुळे या वर्षी चा सप्ता न झाल्यामुळे महिला भजनी मंडळाच्या वतीने 35000 रुपये चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे ठरवले .आणि दि.२१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता माजलगाव च्या तहसीलदार डॉ. प्रतिभाताई गोरे यांच्याकडे दिला आहे. यावेळी भजनी मंडळाच्या मालतीबाई मोताळे,किशोर मोताळे, प्रभावती बाई मोटेगावकर, शोभाताई खेत्रे, गंगाबाई सोनवणे, या प्रमुख महिला उपस्थित होत्या.
.
Leave a comment