आष्टी । वार्ताहर
राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न मार्गी लावला. माजी आ. भीमराव धोंडे यांनी ऊसतोडणी व अन्य कामगारांसाठी विविध प्रकारचे आंदोलने केली आहेत.मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील वाकी चेक पोस्टवर दुपारी ऊसतोड कामगार आल्याचे समजताच माजी आ.भीमराव धोंडे हे ऊसतोडणी कामगारांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले.
भीमराव धोंडे यांनी चेकपोस्टला भेट देऊन सर्वाची जेवण्याची सोय केली. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. काही अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.आष्टी विधानसभा मतदार संघातील ऊसतोड कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या मतदार संघात ऊसतोडणीकामगार पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यावर ऊस तोडणीसाठी मोठ्या संख्येने जात असतात परंतु यावर्षी ऊस तोडणीसाठी गेलेल्या कामगारांना लॉकडाऊन झाल्यामुळे व साखर कारखाने बंद झाल्याने सर्व ऊसतोड कामगार विविध ठिकाणी अडकुन पडले होते.काही ठिकाणी ऊसतोडणी कामगारांना पोलिसांचा मार ही खावा लागला त्यामुळे त्यांचा आपल्या स्वगृही परतण्याचा मार्ग जटील होत असताना जो तो आपापल्या पध्दतीने आपआपल्या राजकीय नेत्यांना फोन करून माहिती देत होते.
Leave a comment