केज । वार्ताहर
शेतबांध कोरल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. केज तालुक्यातील सासुरा शिवारातील शेरी नामक शेतात रविवारी (दि.19) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील पाच जणांवर केज ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला.
पद्माकर वशिष्ट नांदे (रा. सासुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुम्ही आपल्या दोघांच्यामध्ये असलेला बांध का नांगरला अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत कपाळावर दगड मारून जखमी करत ईतरांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून प्रकाश बाबुराव उगले व शकुंतला प्रकाश उगले (दोघे रा. सासुरा) यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला.दुसर्या गटातील प्रकाश उगले यांनीही याच आशयाची तक्रार नोंदवली.आरोपींनी बांध का कोरला? असे विचारले म्हणून दगड मारून जखमी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली या तक्रारीवरून वशिष्ट भिवाजी नांदे, पद्माकर वशिष्ट नांदे व कांता वशिष्ट नांदे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही प्रकरणाचा तपास हवालदार ढाकणे हे करत आहेत.
Leave a comment