गेवराई । वार्ताहार
कोरोना व्हायरस मुळे महाराष्ट्राची जनता आणि राज्य सरकार निकराने लढा देत असताना आपला सुद्धा काही ना काही मदतीचा सहभाग यावेळी असावा या भावनेने गेवराई वकील संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता अकरा हजार रुपयांचा चेक वकील संघाचे अध्यक्ष- अॅड. कमलाकर देशमुख, उपाध्यक्ष- अॅड. पांडुरंग जरांगे आणि सचीव अॅड. प्रदीप मडके यांनी दिनांक 21 एप्रिल रोजी गेवराईचे तहसीलदार धौंडिबा गायकवाड यांच्या कडे सुपूर्द केला.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कमलाकर देशमुख यांनी वकील संघातर्फे दिलेल्या अकरा हजार रुपयांच्या मदती बरोबरच व्यक्तीश: स्वत:चे पुन्हा अकरा हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दिला.वकीलसंघाचे अकरा हजार आणी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कमलाकर देशमुख यांचे अकरा हजार रुपये असे एकूण बावीस हजार रुपयांचे धनादेश तहसीलदार गायकवाड यांच्या कड़े सुपूर्द करण्यात आले.
Leave a comment