दिल्लीहून आलेल्या संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह
परळी । वार्ताहर
राज्यामध्ये कोरोना व्हायरस चा प्रभाव वाढत असतानाच दिल्लीमधील तब्लीकी इस्तेमाचा देखील विषय देशातील नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती घेऊन बसला आहे. इस्तेमामधील तबलीकी जमातीचे नागरिक देशामध्ये कुठे कुठे पसरले याचा तपास घेण्या कामी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामास लागली. त्यातच परळी शहरांमधील आजाद नगर भागातील एक व्यापारी दिल्लीहून परतले आणि त्यांच्याभोवती संशयाची वातावरण निर्माण झाले. ही बाब शासनास कळताच त्यांनी तात्काळ सदर इसमास तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांचा स्वॅब वरील तपासणीत कमी पाठवला. त्याचा शुक्रवारी रिपोर्ट आला असता निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या रिपोर्टकडे परळीकरांचे लक्ष लागून होते. दरम्यान परळी शहरातील सर्व संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याकारणाने नागरिकांनी अशीच सतर्कता बाळगावी. कोणत्याही अफवेस बळी न पडता घाबरून जाऊ नये असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्रसिद्ध जनरल सर्जन डॉ. रामेश्वर लटपटे यांनी केले आहे.
03
Apr
Leave a comment