आष्टी :
गेल्या 24 तासापासून अधिक वेळ कागदपत्र अभावी अडकून पडलेल्या ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोडवला आणि त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
गेल्या दोन दिवसांपासून परजिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार बीड जिल्ह्यामध्ये परत येत आहेत मात्र आष्टी तालुक्यातील वाकी चेकपोस्टवर कालपासून 24 ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबासह अडकून पडले होते त्यांच्याकडे मजुरांची यादी नसल्याने त्यांना वाकी चेक पोस्ट वरून माघारी नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले होते सातारा जिल्ह्यातील जयवंत शुगर या कारखान्यावर कामाला गेलेले मजूर काल सोमवारी सायंकाळी वाकी चेकपोस्टवर चिंचोली ता पाटोदा येथे जाण्यासाठी आले होते त्यांनी तपासणी करताना त्यांच्याकडे कारखाना यादी नसल्याने आढळून आल्यानंतर त्यांना परत नदीच्या पलीकडे नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले होते मंगळवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी वाकी येथील चेक पोस्ट ला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी याठिकाणी येणाऱ्या अडचणी संदर्भात विचारणा केली असता नदीपलीकडे गेल्या 24 तासात हून अधिक वेळ अडकून पडलेल्या कामगारांची कल्पना त्यांना देण्यात आली यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क करून त्यांना यासंदर्भात कल्पना देण्यात आली त्यांनी या संदर्भात निर्णय घेऊन त्या सर्व 24 मजुरांना घरी पाठविण्याचे आदेश दिले.
Leave a comment