आष्टी । वार्ताहर
गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी बीड येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही म्हणून संतप्त जमावाने रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.21) आष्टी येथे घडली.
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला पुढील तपासणीसाठी बीड येथे जाण्याचा सल्ला आष्टी ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला.रुग्णालयाच्या बाहेर असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली मात्र संबंधित त्या संबंधित चालकाने तुम्ही 108 नंबर ला फोन लावून त्यांना कल्पना द्या असे सांगितल्याने या गोष्टीचा राग येऊन या गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या रुग्णवाहिकेला जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळतात आष्टी ठाण्याचे निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न करणार्या या महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Leave a comment