बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात 15 कोरोना संशयितांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. शुक्रवारी सायंकाळी अहवाल मिळाले असून सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. आतापर्यात दोन्हीकडे मिळून 55 लोक दाखल झाले होते. गुरुवारी बीडमधील 13 व अंबाजोगाईतील 2 असे 15 स्वॅब तपासणीला घेवून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या सहा रुग्ण विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली असून सर्वांची प्रकृती ठणठणीतअ असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.आतापर्यंत 49 लोकांना घरी पाठविण्यात आले आहे.
Leave a comment