बीड । वार्ताहर
यंदा तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे. लागवडीसाठी झालेला खर्चसुध्दा निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकर्यांनी यावर्षी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने उत्पन्न देखील चांगले मिळेल अशी शेतकर्यांंना आशा होती.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे टमाटे, भेंडी, मिरची, वांगे, चवळी, गवार यासोबतच कलिंगडला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. झालेला खर्चदेखील निघत नसल्याने मिळेल त्या भावात भाजीपाला विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहे.
लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
व्यापारी शेतकर्यांकडून मातीमोल भावाने माल खरेदी करुन बाजारात चढ्या दराने विकत असल्याचे चित्र आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दाबला गेला असून, यंदा कोरोनामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Leave a comment