बीड । वार्ताहर
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिकांनी 20 मार्चपासून स्वत:हुन दुकाने बंद ठेवले आहेत. आता मात्र उत्पन्नाचे मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्याने नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापैकी बरेच नाभिक व्यवसाय हे भाडेतत्त्वावर आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्या ,हा आर्थिक प्रश्न कुटुंब प्रमुखांसमोर उभा राहिला आहे.
या महाभयंकर कोरोनापासून बचाव करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या काळजीपोटी सर्व सलून दुकाने बंद ठेवली आहेत.दुकाने बंद ठेवल्याने व्यवसायठप्प झाले आहेत. या परिस्थितीत नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाचा विचार करावा. सलून दुकाने पाच ते सहा तास उघडण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून व्यवसाय करताना नियमावली तयार करून आपली व ग्राहकांची काळजी घेण्याची दक्षता घेवु. नाभिक समाजास कोणत्याही प्रकारची आर्थिकमदत मिळाली नाही. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, यासाठी सलूनची दुकाने काही वेळ तरी उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही नाभिक समाज संघटनेने केली आहे.
Leave a comment