जिल्हाधिकारी रेखावार यांचे आदेश जारी
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मंगळवारी पहाटे सव्वा एक वाजता बीड जिल्ह्यासाठी सुधारित आदेश जारी केले आहेत. हे आदेश येत्या 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्याला लागू राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे यापूर्वी लागू केलेली जमावबंदी व संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे.
चला तर मग वाचूया, कोणत्या क्षेत्राला सुट मिळणार आहे.
सर्व प्रकारची आरोग्य सेवा 24 तास सुरू राहील.
कृषि आणि कृषीविषयक सर्व कामासाठी दिवसभर परवानगी असेल.
बँकांच्या शाखा लाभ धारकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमितपणे चालू राहतील,
एटीएम सहकारी संस्था सुरू राहतील.
पेट्रोल,डिझेल पंप, घरगुती गॅस, तेल कंपन्या सुरू राहतील.
टपाल सेवा, पोस्ट ऑफिस सुरू राहतील.
टँकरने पाणीपुरवठा सुरु राहील.
सर्व प्रकारच्या वस्तूंच्या मालवाहतूकीलाही परवानगी आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ग्राहक सेवा केंद्र चालू ठेवता येतील.
कुरियर सेवा सुरू राहील.
फरसाण, मिठाई दुकाने सुरु राहतील.
किराणा दुकान, रेशन दुकान, फळे, भाजीपाला, डेअरी , दूध केंद्रे, पोल्ट्री, मांस ,मच्छी दुकाने, वैरण ,चारा यासाठीच्या दुकानांसाठी परवानगी .
सर्व ट्रक व मालवाहतूक करणारी वाहने ज्यामध्ये दोन वाहक व एक मदतनीस असेल यांना परवानगी
आरोग्य, कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, बँकींग सेवा,ऑनलाईन शिक्षण, मनरेगा कामे, मालवाहतूक, बांधकाम क्षेत्र, उद्योग तसेच खाजगी आस्थापना सुरू करण्यास परवानगी
ग्रामपंचायत स्तरावरील शासनमान्य ग्राहकसेवा, कुरियर सेवा, शीतगृह, गोदामसेवा, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी तसेच वैधकीय आणि आपत्कालीन कर्मचारी यांच्यासाठी हॉटेल, निवासस्थाने, लॉजही सुरु राहतील.
विद्युत वितरण निर्मितीसाठी ट्रान्सफॉर्मर उपकरणे दुरुस्ती दुकानेही सुरू राहणार
आधारभूत खरेदी केंद्र सुरु
जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यात कृषि व कृषिविषयक कामे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी व शेतमजूर यांच्याकडून करण्यात येणारी शेती विषयक विविध कामे दररोज पूर्ण दिवस करता येणार आहेत. किमान आधारभूत किमंत संस्थांचा ज्यात तुील कापूस व हरभरा यांचा समावेश असेल. कृषिविषयक वस्तू, सेवांची खरेदी विक्री करणार्या संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच शेतकरी व शेतकरी समुहांकडून खरेदी करणारे केंद्रे व गावपादतळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्रे दररोज पूर्ण वेळ सुरु राहतील. कृषी यंत्रणाची दुकाने, कीटकनाशके, बियाणे खत विक्री केेंद्रे, सुरु राहणार आहेत.
या ठिकाणी बंदी कायम
जिल्ह्यांतर्गत व राज्यांतर्गत हालचाली बंद राहतील. सर्व शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील.सार्वजनिक वाहतूकीकरिता होणारी बस वाहतूक बंद राहील.रेल्वे सेवा बंद राहिल. रिक्षा बंद राहील.चित्रपट गृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे, बंद राहतील.अंत्यसंस्काराच्या बाबतीत 20 पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल.
Leave a comment