बीड । वार्ताहर

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचा अहवाल सोमवारी (दि.20) कोरोना निगेटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्याने आतापर्यंत पाठविलेले सर्वच 161 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कसोशीने उपाययोजना करत आहे. सध्या जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमांवरुन प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.  सध्या जिल्ह्यात 110 जण संस्थात्मक अलगीकरणात तर 28 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दरम्यान सोमवारी पाठवलेला एक अहवालही कोरोना निगेटिव्ह आला आहे. बीड जिल्ह्यातील एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे तो पिंपळा (ता.आष्टी) येथील आहे. त्यामुळे या परिसरातील पिंपळा,धनगरवाडी, काकडवाडी, खरड गव्हाण,सुमबेवाडी,नांदूर,लोणी,कोयाळ ,कुंटेफळ (पु),सोलापूरवाडी, ठोंबळसांगवी या गावात मागील बारा दिवसांपासून दररोज सर्वेक्षण चालू आहे.एकूण 2620 घरांचा सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 12345व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.