ऊसतोड कामगारांना अडवले अन्
खेड चेकपोस्टवर अडकलेल्या ऊसतोड मजुरांची केली सुटका
लॉकडाऊन मुळे अडकुन पडलेल्या ऊसतोड मजुरांच्या प्रश्न बाबत आ. सुरेश धस हे सध्या आक्रमक झालेले दिसत आहेत.ऊसतोड मजुरांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतल्याने मजुर घराकडे परतु लागलेले आहेत.परंतु किरकोळ ञुटीवरून पश्चिम महाराष्ट्रातुन आलेल्या ऊसतोड मजुरांना खेड येथिल चेकपोस्टवर अडवुन ठेवल्याचे कळताच आ. सुरेश धस घटस्थाळी पोहचले व अधिकार्यांशी चर्चा करून ऊसतोड मजुरांची येथुन सुटका केली. यापूर्वी याच ठिकाणी आ.धस यांनी ऊसतोड मजुरांसाठी ठिय्या मांडला होता. तेव्हा त्यांच्या गुन्हा देखील लाखल झालेला आहे. पुन्हा मदतीसाठी आ.धस आल्याने ऊसतोड मजुरांनी त्याचे आभार मानले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असून,जे ऊसतोड कामगार आहेत.त्यांना आपल्या गावात जाण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शासन आदेश निघाला. गेल्या पंधरा दिवसापासून सतत आ.सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरल्याने राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना सोडण्याचा निर्णय घेतला माञ परतीच्या मार्गावर निघालेल्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेडच्या चेकपोस्टवर रविवारी मध्यराञी अडवून आम्हाला आपण ज्या सोनहिरा, क्रांतीकुंडल यासह इतर कारखान्यावरुन आलेला आहात त्या जिल्हाधिकारी यांचे कागदोपञी आदेश प्राप्त न झाल्याने सोडू शकत नाही, म्हणत पोलीसांनी या मजूरांना अडवून ठेवले. माञ बुधवारी सकाळी आठ वाजता आ.सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासकीय अधिकार्यांशी तात्काळ संवाद साधून या ऊसतोड मजूरांची सुटका केली. यावेळी अडीच हजाराहून अधिक मजूर या ठिकाणी होते. माञ सदरील ऊसतोड मजूरांना गावी पाठवण्याचा शासन आदेश म्हणजे बघाबघीत सहा महिने घालायचे आणि मगच लग्नाची सुपारी फोडायची असला प्रकार असल्याची टिका आ.सुरेश धस यांनी राज्य सरकारवर केली.
चारा न मिळाल्याने म्हैस दगावली
साईनाथ नारायण सानप वडझरी जि.बीड येथील ऊसतोड कामगार हे आपल्या कुटुंबासह गावी निघाले असता रविवारी राञी खेड ता.कर्जत येथे पोलीसांनी अडविल्यामुळे त्यांच्याकडे असणारी म्हैस दगावल्याची दुर्देवी घटना या दरम्यान घडली. राञी दोन ते सकाळी 9 वाजेपर्यंत पाणि आणि चारा न मिळाल्याने ती दगावल्याचे सानप यांनी सांगितले.
Leave a comment