नेकनूर । वार्ताहर

चारित्र्याविषयी गैरसमज पसरवल्याने तांदळवाडी येथील एका महिलेेने विष घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी पती, पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नेकनूर पोलिसांत नोंदवला गेला.

आकाश रामभाऊ जाधव (रा. गेवराई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या बहिणीच्या चारित्र्याविषयी राणी भैय्या वाघमारे व कॄष्णा उर्फ भैय्या वाघमारे यांनी गावात आणि नातेवाईकांत गैरसमज होईल अशी माहिती पसरवली होती. याचा त्यांच्या बहिणीला त्रास झाल्याने तिने 17 एप्रिल रोजी विष घेतले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत राणी वाघमारे व कृष्णा उर्फ भैय्या वाघमारे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर काळे हे करत आहेत.

------------

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.