24 तास आपल्या सेवेत पोलीस कर्मचारी रस्त्यावर ; नागरिकांनी पण घरात रहा, लॉकडाऊनचे पालन करा
औरंगाबाद । वार्ताहर
सुतगिरणी चौकात पोलीसांची कडक तपासणी करीत होते. कोरोना वायरसने जगभरात या विशाणू वायरसने धुमाकूळ घातलेला आहे. आपल्या देशात पण वायरसमुळे संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. औरंगाबाद शहरात महत्त्वाची भूमिका म्हणजे पोलीसांची आहे. आपल्या जीवाची पर्वा न करताना शहरातील नागरीकांसाठी 24 तास सेवेत उभे आहे. पुंडलिकनगर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्ये पार पाडत आहे.
आज दुपारी बारा वाजता सुतगिरणी चौकात वाहनधारकांना थांबून विचारपुस करून पुढे जाऊ देत होते. यात काही नागरीक आपल्या वाहन रस्त्यावर घेऊन येत आहे विनाकारण कोणी दवाखान्याचे कागदपत्रे दाखत होते. तर कोणी मेडीकलचा बाहणा करीत होते. या कर्तव्येवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहनांची कडक तपासणी करूनच,पुढे जाऊ देत होते. विना लायन्स, कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांडून दंड करीत होते. आज दिड वाजेपासून शहरात कडक संचारबंदी करण्यात आलेली आहे. यावेळी पोलीस नागरीक सुचना पण देत होते. दिड वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर आपले काम आटपून घरी जा असे सांगत होते. यावेळी कर्तव्ये पार पाडीत असलेले पीएसआय रावसाहेब मुळे, महिला पीएसआय मिरा चव्हाण, पोहेकॉ भास्कर घोडके, विष्णू मोरे, आनंद मगरे, वैशाली पंचाल, वृषाली भांबरे आदी उपस्थित होते.
Leave a comment